गुरुवारी रात्री मुंबईतील मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉल मध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सिटी सेंटर मॉलमध्ये रात्री 8:53 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लेवल 3 ची ही आग असल्याचे सांगण्यात येत आहे.

मॉलमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.