कोटय़ावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी पालिकेच्या निवृत्त कार्यकारी अभियंचा हरिश्चंद्र मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने घातलेल्या छाप्यात त्यांच्या घरातून लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम आढळली होती.
 मिश्रा व त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी २००९ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागामार्फत चौकशी सुरू होती.
या चौकशीत मिश्रा, त्यांच्या पत्नी रामलली व मुलगा आशिष यांच्या नावाने बोरीवली येथे आदित्य एज्युकेशन कॅम्पस नावाची शिक्षण संस्था, दहिसर येथे सदनिका, व्यावसायिक गाळे, नेवाळे, पालघर येथे २० एकर जमिन, फार्म हाऊस, तसेच गाडय़ा असल्याचे आढळून आले. ज्ञात उत्पन्नापेक्षा ही रक्कम जास्त म्हणजे २ कोटी २१ लाख ९० हजार असल्याचे आढळले. त्यानुसार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थान, फार्म हाऊस येथील झडतीत ३३ लाखांचे सोने, साडेपाच लाखांची रोख रक्कम सापडली आहे. त्या बाबत तपास सुरू आहे.