News Flash

सलिम झकेरिया यांचे निधन

काँग्रेस नेते व माजी शिक्षण राज्यमंत्री सलिम झकेरिया (७४) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

| April 18, 2015 04:23 am

काँग्रेस नेते व माजी शिक्षण राज्यमंत्री सलिम झकेरिया (७४) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्रीपद भूषविले होते.
वांद्रे मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. वक्फ बोर्डसह विविध संस्थांवर त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 4:23 am

Web Title: former maharashtra minister salim zakaria dead
Next Stories
1 कॉ. पानसरे हत्या : ‘एसआयटी’ चौकशीसाठी कुटुंबियांची याचिका
2 लाचखोर मिळकत व्यवस्थापकास अटक
3 शहरात आगीच्या तीन घटना
Just Now!
X