विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून बाहेर पडून मनसेमधून निवडणूक लढविलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी बुधवारी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांची ‘घर वापसी’ झाली असून आगामी महापालिकेचा विचार करूनच त्यांना सेनेत पुन्हा प्रवेश देण्यात आल्याचे सेनेच्या सूत्रांनी सांगितले.
उत्तर मुंबईतील शिवसेनेचे विभाग प्रमुख व माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याशी झालेल्या संघर्षांतून शुभा राऊळ यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी दहिसर मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करून त्यांनाही पाडण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. घोसाळकर विरुद्ध नगरसेविका शीतल म्हात्रे वादात राऊळ यांनी घोसाळकर यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती; तथापि पक्षनेतृत्वाने त्यांना साथ न देता घोसाळकर यांची बाजू उचलून धरल्यामुळे राऊळ यांना पक्षातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता असून शिवसेनेने पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. भाजपनेही एकीकडे पक्षनोंदणी अभियान हाती घेतानाच सेना-मनसेतील नाराज पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचे काम सुरू केले असून राऊळ यांना पक्षात घेण्याची तयारी सुरू केली होती. या पाश्र्वभूमीवर घोसाळकर यांच्या नाराजीची पर्वा न करता सेनानेतृत्वाने राऊळ यांना पुन्हा पक्षात घेतले.

congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
Ajit Pawar, khadakwasla, Baramati lok sabha,
बारामतीच्या निकालाची ‘खडकवासल्या’वर भिस्त!… अजित पवारांनी दिली कबुली
Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election
बारामतीच्या निवडणुकीतून माघार का घेतली? विजय शिवतारे म्हणाले, “…तर उर्जा कशाला वाया घालवायची”
gadchiroli mahavikas aghadi dispute marathi news
गडचिरोलीत महाविकास आघाडीत अंतर्गत कलह; काँग्रेसच्या एककल्ली कारभारावर निष्ठावंतांसह मित्र पक्षांची नाराजी