News Flash

माजी पोलीस आयुक्तांच्या मुलास अटक

जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने काही अटी, बंधने घातली होती.

man-arrested
रवींद्र बराटेच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून अनेक पथकाच्या माध्यमातून तपास सुरू होता.(प्रतिकात्मक छायाचित्र)

 

मुंबई : पत्नीचा पाठलाग केल्याबद्दल तसेच तिला धमकावल्याबद्दल राज त्यागी यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. राज हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आर. डी. त्यागी यांचे चिरंजीव आहेत. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात त्यांना अटक झाली होती. गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्तकेले.

जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने काही अटी, बंधने घातली होती. त्यानुसार राज यांनी वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार नाही, असे प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयास कळवले होते. मात्र जामीन मिळताच राज यांनी पत्नीच्या घराबाहेर पाळत ठेवली, वाहनाचा पाठलाग के ला आणि धमकावलेही, अशी तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नीकडून करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 2:45 am

Web Title: former police commissioner son arrested akp 94
Next Stories
1 बांधकाम मजुराचा तीन मुलांवर विषप्रयोग, एकाचा मृत्यू
2 प्रवासवेळ दुप्पट, त्रास कैकपट
3 लेखक-दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन
Just Now!
X