मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत सहज वावरत गेल्या दशकभरात तळपत राहणारा अभिनेता ही सुबोध भावे यांची ओळख. या अष्टपैलू आणि अभ्यासू अभिनेत्याशी  ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या कार्यक्रमात शुक्रवारी गप्पाष्टक रंगणार आहे.

‘लोकमान्य – एक युगपुरुष’, ‘बालगंधर्व’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चरित्रपटांमधून सुबोध भावे यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. मराठी ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची आवड अबालवृद्धांमध्ये रुजविण्यात सुबोध भावे यांचा खणखणीत अभिनय कारणीभूत आहे. सुबोध भावे यांच्या आजवरच्या वाटचालीचा आलेख १० जुलैला सायंकाळी ५ वाजता गप्पांमधून उलगडण्यात येणार आहे.

सहभागासाठी .. https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_10July  येथे नोंदणी आवश्यक