News Flash

एका घराच्या किमतीत दोन घरे!

सध्याच्या महागाईच्या काळात एखादे घर घेणेही सर्वसामान्यांना परवडत नाही, मात्र एका घराच्या किमतीत जर दोन घरे मिळाली तर?..

| September 27, 2014 05:42 am

सध्याच्या महागाईच्या काळात एखादे घर घेणेही सर्वसामान्यांना परवडत नाही, मात्र एका घराच्या किमतीत जर दोन घरे मिळाली तर?.. हे स्वप्न सत्यात उतरणार आहे, ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ या योजनेद्वारे. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाद्वारे वाचकांना घरे आणि विविध आकर्षक बक्षिसेही मिळणार आहेत.
गेल्या वर्षी या योजनेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदाही ‘लोकसत्ता’ने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने ‘तुलसी इस्टेट’सह केसरी टूर्स व जेके इलेक्ट्रॉनिक यांच्या साथीने हा उपक्रम आयोजित केला आहे. या योजनेत सहभागी असलेल्या बिल्डरकडून वाचकांनी नवीन घर खरेदी करावे आणि त्याची नोंदणी करावी. बिल्डरकडून मिळालेला ‘स्पर्धा फॉर्म’ निर्देशित केल्याप्रमाणे भरून जमा करावा. भाग्यवान ग्राहकांना एका घराबरोबर आणखी एक घर मिळविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याशिवाय रेफ्रिजरेटर, एअरकंडिशनर, एलईडी टीव्ही यांसारखी आकर्षक बक्षिसेही मिळणार आहेत. २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीतच हे ‘स्पर्धा फॉर्म’ भरून देणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक जाणण्यासाठी त्यासंबंधीची जाहिरात पाहा आणि अधिक माहितीसाठी आजची वास्तुरंग पुरवणी वाचा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 5:42 am

Web Title: get two home in one home price
Next Stories
1 ..तर शिक्षणसेवक योजना लागू नाही
2 ४२ लाख रुपयांचा तिकीट गैरव्यवहार उघडकीस
3 कोकणवासीयांसाठी दसऱ्यानिमित्त विशेष गाडय़ा
Just Now!
X