कंटाळलेल्या पक्ष्यांच्या मनोरंजनाची मज्जा; पर्यटकांनाही नवीन गमतीजमतीचा आनंद

मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विनच्या आणखी गमतीजमती येत्या काळात पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. सतत पाण्यात डुंबून आणि चेंडूशी खेळून ‘कंटाळलेल्या’ पेंग्विनच्या विरंगुळय़ासाठी त्यांच्या नवीन कक्षात आठवडाभरात एक छोटी घसरगुंडी आणि सी-सॉ बसवण्यात येणार आहे. ही व्यवस्था झाल्यानंतर पर्यटकांना ओळीत घसरगुंडीचा खेळ खेळणारे पेंग्विन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

प्राणिसंग्रहालयाच्या नवीन कक्षात वास्तव्याला असलेल्या पेंग्विनना सतत क्रियाशील ठेवण्यासाठी उद्यान प्रशासन व पशुवैद्यकतज्ज्ञांकडून वेगवेगळे उपाय योजिले जात आहेत. त्यासाठी या कक्षात चेंडू ठेवण्यात आले असून ‘लेझर’च्या किरणाच्या ठिपक्यांशीही हे पेंग्विन खेळतात. यातच भर म्हणून पुढील आठवडय़ात या ठिकाणी घसरगुंडी आणण्यात येणार आहे. सुमारे ७० सेंटिमीटर उंचीची ही घसरगुंडी पुढच्या शनिवापर्यंत पेंग्विनच्या कक्षात दाखल होईल. ‘सुरुवातीला छोटी घसरगुंडी मागवण्यात आली आहे. हा खेळ त्यांना आवडल्यास थोडी मोठी घसरगुंडीही खरेदी करण्यात येईल,’ अशी माहिती पेंग्विनची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाच्या प्रमुख पशुवैद्यकतज्ज्ञ डॉ. मधुमिता काळे यांनी सांगितले. तसेच पंेग्विनच्या आवश्यकतेनुसार सी-सॉ तयार करण्यात येईल. या ‘सी-सॉ’च्या दोन्ही कोपऱ्याला पकडण्यासाठी हँडल ठेवण्यात येणार नाही. त्यामुळे एखादा पेंग्विन एका बाजूने चढून सहज चालत दुसऱ्या बाजूला जाऊ शकेल, अशी माहिती त्यांनी दिली. हे खेळ खेळण्यासाठी पेंग्विनना काही दिवस प्रशिक्षण देण्यातयेईल, असेही त्या म्हणाल्या.

सध्या हम्बोल्ट कक्षात पेंग्विनसाठी गोलाकार रिंग, चेंडू आहे. ही गोलाकार रिंग डोक्यात घालून पुन्हा काढणे किंवा दुसऱ्या पेंग्विनने घातलेली रिंग काढण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे खेळ हे पेंग्विन खेळतात. अनेकदा हम्बोल्ट कक्षातील डॉक्टरांचे पथकही त्यांच्यासोबत चेंडूने खेळतात. हे पेंग्विन आपल्या चोचीने चेंडू ढकलतात. त्याशिवाय लेझरची किरणे पकडण्याचा खेळही त्यांना आवडतो, अशी माहिती डॉ. काळे यांनी दिली.

‘पेंग्विनना खेळायला खूप आवडते. आणि खेळल्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो. यातून त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पेंग्विनसाठी नवनवीन प्रकार आणले जात आहेत.’

डॉ. मधुमिता काळे, पेंग्विनची देखभाल करणाऱ्या पथकाच्या प्रमुख