कमला मिल परिसरातील दुर्घटनेनंतर उपाहारगृहांच्या बेकायदा बांधकामांवर रविवारीही पालिकेची कारवाई सुरुच राहिली. नववर्षांच्या स्वागतासाठी सजलेल्या अनेक उपाहारगृह, बार यांचे बेकायदा बांधकाम पालिकेच्या अतिक्रमण विभागाने भुईसपाट केले. एकाच दिवसात शहरभरातील ६१५ उपाहारगृहांमध्ये अनियमितता आढळली. त्यातील ३५५ ठिकाणी बेकायदा बांधकामे तोडण्यात आली. मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे आढळलेल्या ३१ उपाहारगृहे किंवा त्यांच्या काही भागाला टाळे ठोकण्यात आले. यात कुर्ला, चेंबूर परिसरातील सर्वाधिक २२ उपाहारगृहे आहेत.

कमला मिलमधील ‘मोजो’ व ‘वन अबव्ह’ या उपाहारगृह व बारमधील दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेला जाग आली असून, शनिवारपासून संपूर्ण शहरात कारवाई सुरू करण्यात आली. रविवारीही सुट्टी न घेता पालिकेचे साहाय्यक आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याच्या कामी लागले होते. सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत कमला मिल व रघुवंशी मिल येथील बहुतांश बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत ३१ उपाहारगृहांना संपूर्ण किंवा काही भागांत टाळे ठोकण्यात आले आणि सुमारे ४२६ सिलिंडर जप्त करण्यात आले. यातील सर्वाधिक २२ उपाहारगृहे एल विभागात (कुर्ला, चेंबूर) असून दहिसर व भांडुपमधील प्रत्येकी तीन तर घाटकोपर येथील एका उपाहारगृहाला टाळे ठोकले गेले. एच पूर्व येथील वांद्रे जिमखाना, खार जिमखाना तसेच वेलिंग्टन जिमखाना आदी क्लबवरीही कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेली काही उपाहारगृहे

  • कुलाबा – महेश लंच होम, हॉटेल डिलक्स, टेस्ट ऑफ केरळ, हॉटेल प्रताप इत्यादी
  • गिरगाव परिसर – ऑर्टेक्स, दिल्ली दरबार, पंचरत्न, ललित बार, पूनम
  • मलबार हिल परिसर – कॅफे सुमाच्या तिसऱ्या मजल्याला टाळे
  • भायखळा – समुद्र हॉटेल, बॉम्बे इंटरनॅशनल, शिवदास छापली मार्गावर बेनामी हुक्का पार्लरमधील ६० हुक्केाव साहित्य जप्त
  • परळ – गोखले सोसायटी खानावळ, सत्यम भोजनालय, कैलास स्वीट, ग्रे प्रीमायसेस, आमंत्रण इत्यादी
  • माटुंगा – मिनी पंजाब, रामी इंटरनॅशनल, मिनी महाल बार इत्यादी
  • दादर, परळ – कमला मिलमधील स्मॅश परिसर, रघुवंशी मिलमधील शिक्षा लाऊंज, रूफटॉप वेल्स स्पॅन, कराओस इत्यादी
  • शीव, धारावी – संसार, धारावी, चायना बिस्त्रे दादर, चायना टाऊन, द स्टेटस रेस्टॉरंट इत्यादी
  • वांद्रे – मेजबान हॉटेल, कॉर्नर हाऊस, थाई स्पा, आयरिश हॉटेल, ऑटर्स क्लब, खार जिमखाना
  • अंधेरी – हॉटेल हयात, (९०० चौ. फू. बांधकाम तोडले), द्वारका स्नॅक्स (१५०० चौ. फू. बांधकाम तोडले), हॉटेल शिवलीला हबिबी हॉटेल अॅण्ड हुक्का पार्लर इत्यादी, इस्टेला कॅफे, कॅफे प्लॅटर, कोयला, मॅड मॅक्स इत्यादी, १६ हॉटेल्समध्ये काही साहित्य जप्त करण्यात आले
  • गोरेगाव – लकी हॉटेल, शांघाय बार, चक्रबार, क्लासिक कोफोर्ट हॉटेल इत्यादी
  • मालाड – हॉटेल रिसॉर्ट मढ, हॉटेल अकसा, सॉलिटेयर, लिंक रोड, साई दर्या ढाबा, हॉटेल कोकोपाम, मार्वे इत्यादी
  • घाटकोपर – खानाखजाना, मिरॅकल बार, अनोखा बार, हॉटेल योगी, बार स्टॉक एक्सचेंज, चेंबूर, ऑरेंज मिंट व ओम साई हॉस्पिटॅलिटी येथे ‘सील’ कारवाई पॉप्युलर फूड ट्रांक, हॉटेल शिवकृपा, ग्रीन विले, माय फेव्हरेत्तो इत्यादी
  • भांडुप – तीन उपाहारगृहांमध्ये ‘सील’ करण्याची कारवाई, मित्र ढाबा, अनंत हॉटेल इत्यादी
  • मुलुंड – साई चायनीज फास्ट फूड, हॉटेल निसर्ग इत्यादी कांदिवली – शिवम सुंदरम इत्यादी
  • बोरिवली – अराऊंड द ग्लोबस, चस्का, एक्झॉटिक, सेंटर पॉइंट इत्यादी
  • दहिसर – गोकुलानंद, क्लासिक व शुभम या उपाहारगृहांमधील अनधिकृत पार्टी हॉल सील करण्यात आला