22 April 2019

News Flash

हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, कुर्ला स्टेशनजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड

शुक्रवारचा दिवस मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांसाठी तापदायक ठरला.

संग्रहित छायाचित्र

मध्य रेल्वेवरील वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच शुक्रवारी संध्याकाळी हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. कुर्ला स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

शुक्रवारचा दिवस मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांसाठी तापदायक ठरला. सकाळी तांत्रिक बिघाड आणि त्यापाठोपाठ वाशिंद स्थानकातील रेल रोकोमुळे मध्य रेल्वेवर कसारा – कल्याण मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. संध्याकाळी वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली.

कुर्ला स्थानकाजवळ पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला. ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी पायी चालत जवळचे स्टेशन गाठले.

First Published on September 14, 2018 5:15 pm

Web Title: harbour railway service disurpted freight train engine technical fault near kurla station