महिला प्रवाशांच्या डब्याकडे मोर्चा; चार दिवसांत दहाहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरू झालेली नसताना महिला प्रवासी डब्यात मात्र फे रीवाल्यांचा वावर वाढू लागला आहे. महिला प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येनंतर फेरीवाल्यांनीही याच डब्याकडे मोर्चा वळवल्याने करोनाकाळात प्रवास करताना अन्य महिलांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागतो. मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडे याविरोधात तक्रोरी आल्यानंतर गेल्या चार दिवसांत १० पेक्षाही जास्त फे रीवाल्यांची धरपकड करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी असलेली लोकल सर्वच महिलांसाठीही २१ ऑक्टोबरपासून खुली करण्यात आली. सामान्य महिला प्रवाशांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर लोकल प्रवासाची मुभा दिली. अन्य वेळेत अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कु णालाही प्रवेश नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. सर्वच महिलांसाठी लोकल प्रवास खुला होताच ११ वाजल्यापासून लोकल गाडय़ांना गर्दी होऊ लागली. तर सायंकाळच्या प्रवासातही तीच गत. मात्र सामान्य महिलांसाठी लोकल प्रवास खुला झाल्यानंतर त्याचाच गैरफायदा घेऊन महिला प्रवासी डब्यात फे रीवाल्यांनी बस्तान मांडले आहे.फे रीवाले स्कार्फ, रुमाल तसेच अन्य वस्तूंची विक्री सर्रास करतात. या वस्तूंची विक्री करणाऱ्या महिला स्थानकात प्रवेश करताना  चांगल्या प्लास्टिकच्या पिशवीतून वस्तू आणतात आणि प्रवेश मिळवल्यानंतर लोकलमध्ये वस्तूंची विक्री करण्यास सुरुवात करतात. दुसऱ्या एखाद्या स्थानकात उतरण्यापूर्वी त्या  वस्तू पुन्हा पिशवीत ठेवून उतरून निघून जातात. त्यामुळे कोणालाही या महिलांवर संशय येत नाही. फे रीवाल्यांच्या सामानामुळे अन्य महिलांना मात्र धक्काबुक्कीला सामोरे जावे लागते. या संदर्भात उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे म्हणाल्या, महिला डब्यात महिला फे रीवाले प्रवेश करताना त्यांच्याजवळील विक्रीच्या वस्तू रेल्वे पोलीस, तिकीट तपासनीसांना दिसणार नाहीत अशा प्रकारे घेऊन येतात. अशा मोठे सामान घेऊन येणाऱ्या महिलांची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

महिला प्रवासी डब्यात फे रीवाले येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरपीएफकडून ९ महिला सुरक्षा  कर्मचाऱ्यांचे पथक बनवण्यात आले आहे. कल्याणपासून दादपर्यंत हे पथक सकाळी ११ नंतरच्या लोकल फे ऱ्यांवर लक्ष ठेवून असते. गेल्या चार दिवसांत दहा फे रीवाल्यांना पकडण्यात आले असून त्यांचे विक्रीसामान जप्त करतानाच दंड आकारला आहे.

-के . के . अशरफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे (आरपीएफ)