मराठा आरक्षणाबद्दल उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले आहे. मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा उल्लेख राज्य सरकारने तयार केलेल्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. सरकारने तयार केलेले हे प्रतिज्ञापत्र उद्या उच्च न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे.