परतीच्या पावसानेही दणका दिल्याने नागरिकांमध्ये काहीशी नाराजी असली तरी यंदा राज्यातील जलाशयांमधील पाण्याची पातळी मात्र निश्चितच समाधानकारक आहे. सततच्या दुष्काळामुळे पिचलेल्या मराठवाडय़ातही एकूण क्षमतेच्या जवळपास ६० टक्क्यांच्या आसपास पाण्याचा साठा झाला आहे.  राज्यात आतापर्यंत एकूण क्षमतेच्या ७४.०५ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.

टँकर सुरूच

एकीकडे समाधानकारक पाऊस झाला असला तरी टँकरने पाणीपुरवठा अद्यापही काही ठिकाणी सुरू आहे. राज्यातील १८४२ वाडय़ा आणि ९०० गावांना ११७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक ८०० टँकर अद्यापही मराठवाडय़ात सुरू आहेत.

धरणांमधील पाणीसाठा..

कोयना (९८.०९ टक्के), जायकवाडी (६८.२७ टक्के), विष्णुपुरी (८९.४३ टक्के), निळवंडे (८७.२१ टक्के), भंडारदरा (१०० टक्के), मुळा (९८.६१ टक्के), गंगापूर (९५ टक्के), दूधगंगा (१०० टक्के), राधानगरी (९९.३४ टक्के), तिलारी (९२.५५ टक्के), खडकवासला (१०० टक्के), पानशेत (१०० टक्के), टेमघर (८४.२० टक्के), वारणा (१०० टक्के), तारळी (९२.०८ टक्के).

 

untitled-5