अंनिसचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना आम्हाला शोधता आलं नसल्याची कबुली गुरुवारी मुंबई हायकोर्टात सीबीआय आणि सीआयडीने दिली. या प्रकरणावर बोलताला मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि सीआयडीला चांगलेच फटकारले आहे. मारेकरी म्हातारे झाल्यावर पकडणार का?, असा खरमरीत प्रश्न हायकोर्टाने तपास यंत्रणांना विचारत आहे.
२० ऑगस्ट २०१३ला डॉ नरेंद्र दाभोळकरांची तर २० फेब्रुवारी २०१४ला  कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली होती. या हत्येंना आता जवळपास चार पाच वर्षे उलटून गेली तरी अजूनही मारेकऱ्यांचा तपास करण्यात तपास यंत्रणांना यश आलेले नाही. पुराव्यांअभावी काही आरोपींना सोडून देण्यात आलं यावर हायकोर्टाने तपास यंत्रणांना चांगलेच फटकारले आहे. तसंच उर्वरीत तपास शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करुन आणि पुरावे मिळवूनच होऊ शकेल अशी माहिती तपास यंत्रणांनी हायकोर्टासमोर दिली. आज भारताची प्रतिमा अशी झाली आहे की कोणत्याही व्यतीला इकडे सुरक्षित वाटत नाही. भारतात कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सुरक्षित नसल्याचे हायकोर्ट म्हटले आहे.
नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांचे मारेकरी पकडले जावेत म्हणून अंनिसतर्फे दर महिन्याच्या २० तारखेला पुण्यात मूक आंदोलन करण्यात येते. आमचा विश्वास देशाच्या न्यायव्यवस्थेवर आहे. मारेकरी पकडले जाऊन त्यांना कठोर शिक्षा होईल अशी आशा या पानसरे आणि दाभोलकर कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तपास यंत्रणांचे हात रिकामेच राहिले आहेत याबाबत अनेकदा टीकाही झाली आहे. आता तर हायकोर्टानेही या संदर्भात तपास यंत्रणांना फटकारले आहे.