शिवाजी पार्क परिसरात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘ओखी’ चक्रीवादळामुळे ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत समुद्रात पाच मीटरपेक्षा उंच लाटांची भरती येणार आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) तसेच शिवाजी पार्क परिसरात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी शिवाजी पार्क आणि परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. येथे येणाऱ्या लोकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, त्यासाठी खबरदारीचे उपाय केले जाणार आहेत.

अग्निशमन दल, पोलीस, भारतीय तटरक्षक दल, नौदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आदींनी त्यांची पथके दादर चौपाटी येथे सज्ज ठेवावी, चैत्यभूमीवर येणाऱ्या लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालावी, अडथळे उभारले जावेत, भरती आणि ओहोटीच्या वेळा दर्शनी भागात लावण्यात याव्यात, अशा सूचना महापालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.