सध्या देशात वेगाने करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून वारंवार सूचना करूनही संचार बंदीचे उल्लघन होत आहे. नागरिकांची रस्त्यावरील गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली असून दुचाकी वाहनांसाठी आता १४ एप्रिलपर्यंत पेट्रोल देण्यास बंदी कऱण्यात आली आहे.

करोनामुळे देशात २१ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरी देखील नागरिक खरेदीच्या नावाखाली तसेच पोलिसांची नजर चुकवून घराबाहेर पडत आहेत. अनेक दुचाकीस्वार शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसून येत आहे. त्यांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने आता आणखी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील दुकाचीस्वारांना १४ एप्रिलपर्यंत पेट्रोल देण्यात येऊ नये, असे आदेश पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये कारवाई कऱण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.