नव्या वर्षांत मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे सात रस्ता ते वडाळा जोडले जाणार आहे. हा प्रकल्प ११.२० किमी लांबीचा असून तो ऑगस्टमध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून उदंचन प्रक्रिया प्रभावी करण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर सिमेन्स गाडय़ा धावण्याची शक्यता आहे, तर मध्य रेल्वेवर ४० नव्या फेऱ्या सुरू होणार आहेत. कुर्ला ते कल्याणदरम्यान ११ फेऱ्या, ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशीमध्ये २२ फेऱ्या, तर हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसटीदरम्यान सात फेऱ्या वाढणार आहेत.
उदंचन प्रभावी करणार..
‘२६ जुलै’ रोजी मुंबईत हाहाकार उडाल्यानंतर पालिकेने ब्रिमस्टोवॉड प्रकल्पांतर्गत मुंबईत आठ ठिकाणी उदंचन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्पावसाळ्यात पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या गझदरबंद व ब्रिटानिया उदंचन केंद्राचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, येत्या मे मध्ये केंद्राची कामे पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पांतर्गत मुंबईत आठ ठिकाणी उदंचन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी हाजीअली, इर्ला, लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलॅण्ड बंदर येथील उदंचन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ब्रिटानिया उदंचन केंद्राचे ८० टक्के, तर गझदरबंद उदंचन केंद्राचे २० ते २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ब्रिटानिया उदंचन केंद्रामुळे भायखळा, हिंदमाता, रे रोड, दादर; तर गझदरबंद उदंचन केंद्रामुळे खार, सांताक्रूझ, विलेपार्ले या उपनगरांमधील पश्चिम भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा होऊ शकेल.