मध्य, पश्चिम मार्गांवर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली असून लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवर सुमारे २१ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करू लागल्याने लोकल फे ऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, शुक्रवारपासून या दोन्ही मार्गांवर २०४ फे ऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात लोकलच्या एकू ण दोन हजार ९८५ फे ऱ्या होणार आहेत.

टाळेबंदी शिथिल होताना जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावू लागल्या. पोलीस, पालिका कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या लोकल गाड्यांमधून मागणीनुसार विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली. पश्चिम रेल्वे उपनगरीय लोकलमधून २३ डिसेंबर २०२० मध्ये सात लाख ५९ हजार ३७८ प्रवाशी प्रवास करीत होते. प्रवाशांची संख्या ६ जानेवारी २०२१ पर्यंत ८ लाख २५ हजार ३८३ वर पोहोचली. आता हीच संख्या ११ लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी दिली. त्यामुळे फे ऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येत आहे. टाळेबंदीआधी पश्चिम रेल्वेवर दररोज एक हजार ३६७ लोकल फे ऱ्या होत होत्या. त्यानंतर फे ऱ्यांमध्ये हळूहळू वाढ करुन १,२०१ फे ऱ्या चालवण्यात येत होत्या. २९ जानेवारीपासून आणखी ९९ फे ऱ्यांची भर पडेल. मध्य रेल्वेवरही प्रवासी संख्येत वाढ होत आहे. दोन महिन्यांपूर्वी सहा ते सात लाख प्रवासी दररोज लोकलमधून प्रवास करीत होते. आता प्रवाशांची संख्या प्रतिदिन १० लाखांवर पोहोचली आहे.  त्यामुळे सध्याच्या एक हजार ५८० लोकल फे ऱ्यांमध्ये वाढ करून त्या १ हजार ६८५ पर्यंत करण्यात येणार आहेत.

नियमांना हरताळ

करोनाकाळात शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी एका लोकलमधून ७०० प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी होती. परंतु कमी लोकल फे ऱ्या, सकाळी व सायंकाळी कामाच्या वेळी होणारी गर्दी यामुळे शारीरिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडू लागला. आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ होत आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे.

९५ टक्के लोकल फेऱ्या

टाळेबंदीआधी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरून दररोज एकू ण ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यासाठी तीन हजार १४१ लोकल फे ऱ्या होत होत्या. आता दोन हजार ९८५ लोकल फे ऱ्या चालवल्या जाणार असून जवळपास ९५ टक्के  फे ऱ्या होतील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.