मुंबई : दी इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लि.च्या जाहिरात विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कृष्णा सामंत (४९) यांचे नुकतेच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. राजेश यांचे जाहिरात विभागासाठी मोठे योगदान लाभले. अत्यंत मनमिळाऊ  स्वभावामुळे ते एक्स्प्रेस समूहाच्या कामगार वर्गात सुपरिचित होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.