समाज माध्यमांवर आपले मत व्यक्त करण्यात भारतीय आघाडीवर असल्याचे नुकतेच एका पाहणीतून समोर आले आहे. याचा प्रत्यय ट्विटरने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालावरून आला आहे. सरत्या वर्षांत भारतीयांनी ट्विटरवर विविध वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या अहवालातील काही महत्त्वाच्या नोंदी.
सर्वाधिक ट्वीट झालेल्या घटना
* भारत वि. पाकिस्तान सामना – क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सामन्यात ११ कोटी ८३ लाख ट्वीट्स आले होते.
* दिल्ली निवडणुकीच्या वेळेस दिल्ली इलेक्शनचा हॅश टॅग सर्वाधिक लोकप्रिय झाला होता. या कालावधीत एक कोटींहून अधिक ट्वीट्स आले.
* यंदाच्या दिवाळीत प्रथम ट्विटरने दिवाळीसाठी स्वतंत्र ‘इमोजी’ दिला होता. त्यामुळे दिवाळीच्या दरम्यानही सर्वाधिक ट्वीट झाले.
* चेन्नईत झालेल्या पावसावरही चार दिवसांत तब्बल १४ लाख ट्वीट्स झाले होते.
* तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका दिवसात सैन्य दलाचा सन्मान करणारे तब्बल एक लाख ट्वीट्स नोंदविले गेले आहेत.
लोकप्रिय हॅशटॅग
* आयपीएल – संपूर्ण आयपीएलच्या कालावधीत ९० लाखाहून अधिक ट्वीट्स नोंदविले गेले.
* बिहार रिझल्ट – बिहार निवडणुकांच्या निकाला संदर्भात तयार झालेल्या या हॅशटॅगवर तब्बल दोन लाख ६० हजार ट्वीट नोंदविले गेलेत.
* साल एक शुरुवात अनेक – मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या या हॅशटॅगवर एक लाख ७९ हजार ट्वीट नोंदविले गेले.
सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्ती
* अमिताभ बच्चन – १ कोटी ८१ लाख
* शाहरुख खान – १ कोटी ६५ लाख
* नरेंद्र मोदी – १ कोटी ६४ लाख
* आमिर खान – १ कोटी ५५ लाख
* सलमान खान – १ कोटी ५० लाख
* दीपिका पदुकोन – १ कोटी २३ लाख
* प्रियांका चोप्रा – १ कोटी १८ लाख
* ए. आर. रेहमान – ९५ लाख