News Flash

इंद्राणी मुखर्जीचा आत्महत्येचा प्रयत्न? कारागृहात बेशुद्धावस्थेत सापडली

शीना बोरा हत्येच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेली तिची आई इंद्राणी मुखर्जी ही कारागृहात बेशुद्धावस्थेत सापडली.

शीना बोरा हत्येच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेली तिची आई इंद्राणी मुखर्जी ही कारागृहात बेशुद्धावस्थेत सापडली. तिच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. इंद्राणीने गोळ्या घेतल्या असाव्यात आणि त्यामुळे ती बेशुद्ध पडली असावी, असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इंद्राणीला बेशुद्धावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले असून २४ तासांमध्ये तिच्या प्रकृतीत सुधारणा होणे अपेक्षित आहे. तसेच उपचारांना ती कसा प्रतिसाद देते हे महत्त्वाचे ठरेल, असे डॉक्टरांनी सांगितले. इंद्राणीला  न्यायालयीन कोठडी मिळाली असून ती भायखळा कारागृहात आहे. अस्वस्थता वाटत असल्याची तक्रार करण्यात आल्यावर तिला शुक्रवारी दुपारी जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. इंद्राणी दररोज सकाळी आणि सायंकाळी एक एक गोळी घेते. त्या वेळी तिच्यावर नजर ठेवली जाते. त्यामुळे तिच्यावर नजर ठेवणाऱ्या अधिकाऱ्याकडून त्याबाबतचा अहवाल मागवण्यात आला असून त्यानंतरच नेमके काय झाले हे सांगता येईल, असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. वैद्यकीय अहवालानंतरच इंद्राणीला नक्की काय झाले हे स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 3:19 am

Web Title: indrani mukerjea tried to commit suicide
टॅग : Indrani Mukerjea
Next Stories
1 मुंबईत ‘स्वच्छता अभियाना’चा जागर
2 आई नको, मला बाबांसोबत राहायचे आहे.. १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची न्यायाधीशांकडे याचना
3 राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेचा मृतदेह सापडला
Just Now!
X