कॅप्टन अदिती परांजपे यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात ‘उडत्या’ गप्पांना रंग

आयुष्यात तुम्हाला काय व्हायचे आहे आणि तुमचे ध्येय काय आहे हे पक्के ठरवले पाहिजे. ते एकदा ठरले की आपल्या ध्येयावर विश्वास ठेवून पुढे जायचा निर्धार करायला हवा. त्यातूनच तुमची स्वप्ने पूर्ण होतील, अशा शब्दांत जेट एअरवेजच्या युवा वैमानिक कॅप्टन अदिती परांजपे यांनी उपस्थित तरुणींना प्रेरणा दिली. निमित्त होते ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ कार्यक्रमाचे!

ms dhoni suresh raina
“मी तेव्हा धोनीला सांगितलं होतं”, चार वर्षांनंतर सुरेश रैनानं ‘त्या’ प्रसंगावर केला खुलासा; IPL २०२१ वरही केलं भाष्य!
israel hamas war
अग्रलेख : नरसंहाराची नशा!
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

लहानपणी वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिलेल्या अदिती परांजपे यांनी आपल्या स्वप्नपूर्तीचा प्रवास नेमक्या शब्दांत विशद केला. वैमानिक होण्यासाठी लागणारे कौशल्य कसे आत्मसात करावे हे त्यांनी मुद्देसूदपणे व रंजकपणे उपस्थितांपुढे उलगडले. वैमानिक होण्याआधी फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे परांजपे यांनी अधोरेखित केले.

वैमानिक व्हायचे ही गोष्ट इयत्ता चौथीत असतानाच आपण नक्की केली होती. त्यावर आपण इतके ठाम होतो की, करिअरबाबत इतर कोणताही पर्याय समोर ठेवला नव्हता. विशेष म्हणजे पालकांनीही मोलाची साथ दिल्याने हे स्वप्न पूर्ण होऊ शकले, असे कॅ. अदिती यांनी सांगितले. पार्ले टिळक शाळेत शिकत असताना आमच्या शाळेवरून विमाने सातत्याने जायची. ही विमाने खाली उतरायची आणि आम्ही वर्गाच्या खिडकीत बसून त्यांच्याकडे बघायचो. पुढे वैमानिक झाल्यानंतर पहिल्यांदा विमान उतरवत असताना माझी शाळा दिसली आणि कॉकपीटमध्ये मी आनंदाने ओरडले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

शाळेत असताना नेव्हीनगरला ‘सी कॅडेट कोअर’चे प्रशिक्षण घेत असताना माझ्यात आत्मविश्वात व नेतृत्वगुणांचा विकास होऊ शकला. पुढे वैमानिक होण्यासाठीच्या शिक्षणाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, बारावीत विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र व गणित हे विषय घेऊन ७० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. बारावीनंतर मी ‘बी.एस्सी. एव्हिएशन’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तसेच वैमानिक होण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाने आखून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवावा लागतो. त्यासाठी येणारा खर्च खूप असून आता बँकांकडून कर्ज मिळते.

आरक्षणाची गरज नाही : सध्या खूप मुली व

विशेषत: मराठी मुली या क्षेत्राकडे वळत असून येथे ज्ञानाची व कर्तबगारीची आवश्यकता असल्याने मुलींना व महिलांना आरक्षणाची गरज नाही. अशा कोणत्याही सवलती व आरक्षणे मी घेतली नव्हती असे त्यांनी ठामपणे सांगितले. कॅप्टन अदिती परांजपे यांच्या मुलाखतीचा सविस्तर वृत्तान्त २२ एप्रिलच्या ‘व्हिवा लाउंज’मध्ये वाचण्यास मिळणार आहे.