राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त राज्यातील किमान ८० हजार सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खासगी, निमशासकीय कं पन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने के ला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करताना, बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल का, याचा विचार करण्यात आला. त्यानिमित्त किमान काही बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची योजना राबिवण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सोमवारपासून ‘महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणी १२ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. जे लोक नोंदणी करतील, त्यांना रोजगाराची संधी उपब्ध करून दिली जाईल, असे मलिक यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:28 am