मुंबईतील कमला नेहरु पार्क बच्चेकंपनीला खेळण्यासाठी पुन्हा एकदा खुले झाले आहे. या उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उद्यानात असलेल्या म्हातारीच्या बुटात जाऊन बच्चेकंपनीला खेळ खेळता येणार आहेत. बच्चेकंपनीला या बुटात जाऊन खेळ करणे सुमारे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ बंद होते. मात्र आता मुंबई महापालिकेने या बुटाचे आणि संपूर्ण कमला नेहरू पार्कचे नुतनीकरण केले आहे. नर्सरीत शिकवल्या जाणाऱ्या कविता ही आता कमला नेहेरू पार्कची थीम आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

हँगिग गार्डन किंवा फिरोजशहा मेहता गार्डन नावाने ओळखले जाणाऱ्या पार्कचेही नुतनीकरण करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटीचे विहंगम दृश्य कमला नेहरू पार्कमधून दिसते. तर इथे असलेल्या अँपी थिएटरला इंद्रधनुष्याच्या रंगात रंगवण्यात आले आहे. तर या बागेत असलेला कारंजाही दुरुस्त करण्यात आला. अशोका पिलरला तिरंगी रोषणाई करुन सजवण्यात आले आहे. पाच कोटी रुपये खर्च करुन या उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या पार्कचे उद्घाटन केले. या पार्कमध्ये सेल्फी पॉईंटही उभारण्यात आले आहेत.

MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

कमला नेहरु उद्यान हे नाव पंडित नेहरू यांच्या पत्नीच्या नावामुळे या उद्यानाला देण्यात आले आहे. मात्र इथला म्हातारीचा बूट बच्चेकंपनीत प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून या बागेची दुरवस्था झाली होती आणि बुटातही जाता येत नव्हते. आता मात्र लहान मुलांसाठी हा बूट खुला करण्यात आला आहे. त्यामुळे म्हातारीच्या बुटात जाऊन खेळण्याची मजा बच्चेकंपनीला पुन्हा अनुभवण्यात येणार आहे. सध्या परीक्षांचे दिवस आहेत. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात या उद्यानाला चांगला प्रतिसाद मिळू शकणार आहे.