शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली आहे. अरुण गवळीने शिक्षेला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. २ मार्च २००७ रोजी मुंबईमधील असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली. यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालायने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. हत्येसाठी अरुण गवळीने ३० लाखांची सुपारी दिली होती. न्यायालायने अरुण गवळीसोबत इतर दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सोबत १४ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. अरुण गवळीसोबत इतरांनीही जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने याचिका फेटाळली असून जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Modi, Sharad Pawar, pune,
मोदींचा पराभव करायला तयार रहा, शरद पवार यांच्याकडून हल्लाबोल
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने अटक करण्यात आली होती. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला त्याच्या दगडी चाळीत जाऊन अटक केली होती.

काय आहे कमलाकर जामसंडेकर प्रकरण?
कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वे याने अरुण गवळीच्या टोळीमधील दोन व्यक्तींना जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यांनी सदाशिव सुर्वेची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने या हत्येसाठी ३० लाखांची सुपारी मागितली होती. सदाशिव सुर्वेने होकार दिल्यावर गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर यांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले होते. यानंतर शूटरच्या मदतीने २ मार्च २००७ रोजी कलमाकर जामसंडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी गोळीबार करत हत्या करण्यात आली.