कांदिवलीत ठाकूर व्हिलेजमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या मुलीचे नाव अद्याप समजलेले नाही. तिने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ती नवव्या इयत्तेत शिकत होती.
या आत्महत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. या तरुणीने आत्महत्या केली त्यावेळी खाली लोक उभे होते. मुलीने उडी मारु नये यासाठी त्यांनी आरडा-ओरडा सुद्धा केला पण कोणीही या मुलीला वाचवू शकले नाही. या मुलीने का आत्महत्या केली ते समजू शकलेले नाही. समता नगर पोलीस या आत्महत्येचा तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 11:35 am