मुंबई-गोवा महामार्गाला लागून असल्यामुळे व निसर्गाचे वरदान लाभल्यामुळे कर्नाळाला अनेक पर्यटक भेट देतात. पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा किल्ल्याची दुरावस्ता झाली आहे. याकडे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने पुरातत्व विभागाकडे वारंवार तक्रारही करण्यात आली. मात्र पुरातत्व विभागाकडू किल्ल्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे.

कर्नाळा किल्ल्याच्या बाजूच्या कडय़ावर दोन बुरूज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. १५०० फूट उंचावर असणाऱ्या कर्नाळा किल्ल्याच्या बुरूजाला भेगा पडल्या आहेत तर मुख्य प्रवेशद्वाराचे कमान पडण्याच्या स्थितीत आहे. येथे वर्षभर पर्यटकांची रिघ असते. किल्ल्याच्या आजूबाजूला जंगल असून पायथ्याशी पक्षी संग्रहालय आहे. वन विभागाकडून कर्नाळा जंगलाचे संवर्धन योग्य प्रकारे होत आहे.

किल्ल्याच्या पहिल्या बुरूजाला मोठ्या प्रमाणात भेगा गेल्या असून तो ढासळण्याच्या स्थितीत आहेत. तर प्रवेशद्वाराची चौकोनी कमान जी तग धरून होती ती बुरूजापासून वेगळी होऊन पडण्या्याच्या स्थितीत आहे.. वाड्याची भिंत आतून ढासळलेली आहे. तसेच गडावर अवघड ठिकाणी रेलिंगची गरज आहे. काही महिन्यापूर्वी येथे अनेक पर्यटकांचा अपघात झालेला आहे.

कर्नाळा किल्ला संरक्षित होऊन त्याची डागडुजी व्हावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीन पुरातत्व विभागाला पत्रे पाठवण्यात आली. त्यानुसार सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानुसार किल्ल्यावर नोटीसही लावण्यात आली.

मात्र पुरातत्व विभागाकडून पुढे कोणतीही पावले उचलली नाहीत. किल्ल्याचा दुर्ग अवशेषांची दुरावस्था झाल्यास याला जबाबदार कोण? बुरूज ढासळल्यास आणि दरवाजाची कमान पडल्यास किल्ल्याच्या मूळ वस्तूंचे मोठं नुकासन होऊ शकते. पुरातत्व विभागाने लवकरात लवकर यावर पावले उचलावीत अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.