14 December 2017

News Flash

कला व्यवसायाचे भीष्माचार्य केकू गांधी कालवश

स्वातंत्र्यपूर्व काळापासून चित्रविक्री व्यवसायात राहून आधुनिक भारतीय कलेचा इतिहास घडविणारे गॅलरी केमोल्डचे संस्थापक

मुंबई : | Updated: November 11, 2012 2:35 AM

स्वातंत्र्यपूर्व काळापासून चित्रविक्री व्यवसायात राहून आधुनिक भारतीय कलेचा इतिहास घडविणारे गॅलरी केमोल्डचे संस्थापक व माजी संचालक केकू गांधी यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.केकू यांच्या पार्थिवाचे दहन शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी करण्यात आले. त्या वेळी मुंबईतील महत्त्वाचे कलादालन चालक व अव्वल चित्रकार उपस्थित होते. ‘माझे अनेक मित्र पारशी नाहीत, त्यांच्याप्रमाणे माझ्यावरही दहनसंस्कार होणे आवडेल’ अशी केकू यांची इच्छा असल्याचे त्यांचे पुत्र आदिल म्हणाले.    

First Published on November 11, 2012 2:35 am

Web Title: keku gandhi dead