News Flash

VIDEO : आशिया खंडातील पहिलं स्टॉक मार्केट सुरू झालं या वटवृक्षांच्या छायेत

आशिया खंडातला सर्वात जुना शेअर बाजार इथल्या वडाच्या छायेत भरायचा

VIDEO : आशिया खंडातील पहिलं स्टॉक मार्केट सुरू झालं या वटवृक्षांच्या छायेत

मुंबईतील फोर्टमध्ये हाॅर्निमन सर्कल दोन ऐतिहासिक गोष्टींचा साक्षीदार आहे. आजही सुरू असलेलं आशिया खंडातलं सर्वात जुनं वृत्तपत्र येथून सुरू झालं तसंच आशिया खंडातला सर्वात जुना शेअर बाजार इथल्या वडाच्या छायेत भरायचा. आता मुंबई शेअर बाजाराची टोलेगंज इमारत बाजुला उभी आहे परंतु काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन इथल्या वडाच्या झाडाखाली शेअर बाजार सुरू केला. देशी लोकांची सत्तर टक्के वस्ती आगीत भस्मसात करणारी दी ग्रेट बाॅंबे फायर लागल्यानंतर याच भागात मुंबईतल्या फायर ब्रिगेडची किंवा अग्निशमन दलाची स्थापना करण्यात आली.

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 8:01 am

Web Title: know how the oldest stock market of asia started in bombay nck 90
Next Stories
1 रात्रीची मुंबई शांतच!
2 उपनगरांतही सुका कचरा विलगीकरण
3 रुग्णांच्या पत्नींकडून एकमेकींच्या पतीला मूत्रपिंडदान
Just Now!
X