News Flash

ड्रग्ज प्रकरण : २४ तासांच्या चौकशीनंतर क्षितीज प्रसादला अटक

चौकशीमध्ये क्षितीजने केला अनेक गोष्टींचा उलगडा

धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितीज प्रसाद याला एनसीबीने अटक केली आहे. शुक्रवारी एनसीबीने क्षितीजची जवळपास २४ तास चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी त्याला ताब्यात घेतलं आहे. तसंच लवकरच त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून त्याला न्यायलयासमोर हजर करण्यात येणार आहे. सोबतच रिमांड मागण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. यामध्येच धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसाद याचंही नावाचा समावेश होता. त्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं असून त्याला अटक केली आहे.

२५ सप्टेंबर रोजी एनसीबीने क्षितीजची कसून चौकशी केली. या चौकशीमध्ये क्षितीजने अनेक गोष्टींचा उलगडा केला. तसंच तो हॅश आणि एमडीएमए याची विक्री करत होता हेदेखील त्याने मान्य केलं आहे. क्षितीजवर ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. यासोबतच क्षितीजच्या घरी होणाऱ्या प्रत्येक पार्टी किंवा कार्यक्रमामध्ये ड्रग पेडलर अंकुश सहभागी असायचा हेदेखील समोर आलं आहे. विशेष म्हणजे ड्रग्ज कनेक्शनमध्ये क्षितीजचं नाव आल्यानंतर दिग्दर्शक करण जोहरने त्याला ओळत नसल्याचं म्हणत त्याचा आणि धर्मा प्रोडक्शनचा काहीही संबंध नाही, असं एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

क्षितीज प्रसादला ओळखण्यास करण जोहरचा नकार

“माझ्या घरी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते. यापूर्वीदेखील मी सांगितलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगतो. आमच्या पार्टीमध्ये ड्रग्ज आणण्यात आलेच नव्हते आणि कोणी त्याचं सेवनही केलं नव्हतं. धर्मा प्रोडक्शनविषयी माध्यमांमध्ये चुकीच्या गोष्टी येत आहेत. तसंच क्षितिज रवि प्रसाद व अनुभव चोप्रा या दोन व्यक्तींचा आणि धर्मा प्रोडक्शनचा संबंध जोडण्यात येत आहे. त्यांचा आणि माझा किंवा धर्मा प्रोडक्शचा कोणताच संबंध नाही. तसंच मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतदेखील नाही. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे राहतात किंवा काय करतात याच्याशी मला किंवा धर्मा प्रोडक्शनला काही घेणं-देणं नाही”, असं करण म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 4:18 pm

Web Title: kshitij prasad has been arrested by the ncb after being interrogated for almost 24 hours in drug chat case ssj 93
Next Stories
1 केईएम रुग्णालयात झाली करोना लशीची चाचणी, आणखी १६० जणांची चाचणी होणार
2 ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री सारा अली खानची होणार चौकशी; एनसीबी कार्यालयात दाखल
3 दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल
Just Now!
X