19 November 2017

News Flash

ऐरोलीजवळ लोकलचे चार डबे घसरले; रेल्वे वाहतूक ठप्प

ट्रान्सहार्बर मार्गावर ऐरोलीजवळ लोकलचे डबे घसरल्याने ठाणे ते पनवेल मार्गावरील वाहतूक शनिवारी संध्याकाळी ठप्प

मुंबई | Updated: February 9, 2013 5:45 AM

ट्रान्सहार्बर मार्गावर ऐरोलीजवळ लोकलचे डबे घसरल्याने ठाणे ते पनवेल मार्गावरील वाहतूक शनिवारी संध्याकाळी ठप्प झाली. 
पनवेलहून ठाण्याकडे निघालेल्या लोकलचे चार डबे ऐरोली स्थानकाजवळ घसरले. त्यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. डबे बाजूला काढण्याचे काम वेगाने सुरू असून, वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यासाठी ३ ते ४ तासांचा वेळ लागेल, असे रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले.

First Published on February 9, 2013 5:45 am

Web Title: local bogies derailed near airoli station