21 September 2020

News Flash

नवी मुंबईत मतदारांना पैसे वाटणाऱ्या दोघांना अटक

कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

(संग्रहित छायाचित्र)

कामोठे येथे  पैसे वाटप करणाऱ्या दोघा कार्यकर्त्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११ हजार ९०० रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह ,फोटो व नावे असलेली यादी सापडली

चरणदीपसिंग, बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक पनवेल मनपा) , महेंद्र जगन्नाथ भोपी , विजय त्रिंबक चिपळकर(नगरसेवक पनवेल मनपा यांनी या इसमांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

कामोठे पोलिसांनी मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी भा. द.वि. कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 8:39 pm

Web Title: loksabha election 2019 2 arrest money navi mumbai
Next Stories
1 ‘जेट’च्या कर्मचाऱ्याची नालासोपाऱ्यात आत्महत्या
2 अजान सुरू होताच राहुल गांधींनी भाषण थांबवले
3 Good News! पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ
Just Now!
X