खुलेपणाने मांडा तुमची मते
vasudev_gade
ब्लॉग बेंचर्स हा उत्तम उपक्रम आहे. तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर मोठय़ा प्रमाणावर करत असते. मात्र तो अनेकदा खूप उथळ असल्याचेही जाणवते. सोशल मीडियाच्या वापराला या उपक्रमामुळे  विधायक वळण मिळेल. विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग आता उपलब्ध आहेत. माहिती मिळण्याचा वेगही खूप जास्त आहे. मात्र मिळालेल्या माहितीवर स्वत: विचार करणे आणि त्यावर व्यक्त होणे ही सवय कमी झाली आहे. ती वाढीस लागण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. त्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चांगले व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. आजूबाजूला घडणाऱ्या विविध गोष्टींवर तरुण पिढीची भूमिका काय, हे या माध्यमातून समोर येईल. आपल्याबरोबरच इतर लोक काय विचार करतात हे आपोआपच कळेल आणि त्यातून आपल्यातील त्रुटीही लक्षात येऊ शकतील. विद्यार्थ्यांचे भान वाढवणाऱ्या या उपक्रमाला महाविद्यालयांनी अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना मी करतो. – डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

स्पर्धेत सहभागी  होण्यासाठी..

  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
  • ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे.  लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
  • यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
  • ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.

अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’