24 September 2020

News Flash

‘विचारशील होण्यासाठी लिहिणे आवश्यक’

युवकांमधील विचारशीलता जागृत राहण्यासाठी लेखन करणे आवश्यक असून खास युवकांसाठी सुरू

मयूर पाटील याला संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र व पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

युवकांमधील विचारशीलता जागृत राहण्यासाठी लेखन करणे आवश्यक असून खास युवकांसाठी सुरू झालेला ‘ब्लॉग बेंचर्स’चा उपक्रम ही चांगली संधी आहे, असे मत माटुंग्याच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतील विद्यार्थी व ‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेल्या मयूर पाटील याने व्यक्त केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेत झालेल्या पारितोषिक वितरण समारंभावेळी तो बोलत होता. संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र व पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
आठव्या लेखाला यश
‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये मी सात वेळा लेखन केले होते. सातही वेळा मला यश मिळाले नाही, मात्र मी लेखनात सातत्य ठेवले आणि आठव्या वेळी ‘सडक्यातले किडके’ अग्रलेखावर मत व्यक्त केले, तेव्हा मला यश मिळाले आहे. त्यामुळे लेखनात सातत्य ठेवणे ही महत्त्वाची बाब असल्याचे मयूर याने उपस्थितांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:11 am

Web Title: loksatta blog benchers mayur patil
Next Stories
1 विकास साध्य करण्यासाठी महिलांचा सहभाग वाढविणे आवश्यक-मुख्यमंत्री
2 खासगी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सीईटीबाबत संभ्रम कायम
3 प्रस्तावित आदर्श भाडेकरू कायद्यासाठी भाजप सरसावले!
Just Now!
X