शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत सद्यस्थितीत काय करावे, नव्या टप्प्याची वाट पाहावी, की लगेच गुंतवणूक करावी, अशा विविध प्रश्नांची उत्तरे गुरुवारी, २८ एप्रिल रोजी मिळणार आहेत. निमित्त आहे ‘लोकसत्ता’च्या ‘अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन आणि ‘आर्थिक गुंतवणुकीच्या सल्ल्या’चे!

‘आर्थिक आरोग्याची गुरुकिल्ली’ समजला जाणारा ‘लोकसत्ता’चा २०१६-१७ साठीचा ‘अर्थब्रह्म’ हा विशेषांक २८ एप्रिल रोजी प्रकाशित होत आहे. रिजेन्सी ग्रुप प्रस्तुत आणि बीएनपी पारिबास म्युच्युअल फंड यांचे सहप्रायोजकत्व लाभलेल्या या उपक्रमासाठी (पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, केसरी आणि नातू परांजपे) प्रवेश विनामूल्य आहे. मात्र प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (काही जागा निमंत्रितांसाठी राखीव) दिले जाणार आहे.

केव्हा, कुठे?

गुरुवार, २८ एप्रिल २०१६

वेळ : सायं. ६ वाजता

स्थळ : यशवंत नाटय़ मंदिर, जे. के. सावंत मार्ग, माटुंगा (प.)

सहभाग : अजय वाळिंबे, भक्ती रसाळ आणि चंद्रशेखर वझे

(प्रवेश : विनामूल्य, आसनक्षमतेनुसार)