03 June 2020

News Flash

गुंतवणूक कशी व कुठे करावी?

निमित्त आहे ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या निमित्ताने दादरमध्ये होणाऱ्या गुंतवणूक साक्षरता उपक्रमाचे. ‘

दादरमध्ये आज गुंतवणूकदारांना मार्गदर्शन;‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चे अर्थतज्ज्ञांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘संपत्ती निर्मिती’वर भर देणाऱ्या नव्या वित्त वर्षांच्या अर्थसंकल्पातील तरतुदीद्वारे प्रत्यक्षात बचत व गुंतवणूक कशी वाढवावी? ‘सुलभ प्राप्तिकर’ रचनेद्वारे जमा-खर्चाचे गणित कसे मांडावे? महाग-स्वस्त वस्तूबरोबरच गुंतवणुकीच्या विविध पर्यायांबाबतचे धोरण महिन्याने सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षांपासून कसे आखावे? अशा अनेक अर्थसंकल्पीय तसेच एकूणच गुंतवणुकीबाबतचे शंका-समाधान मंगळवारी होणार आहे. भांडवली बाजार, म्युच्युअल फंड तसेच स्थावर मालमत्ता, मौल्यवान धातू आदी गुंतवणूक पर्यायावरही उपस्थित अर्थतज्ज्ञांद्वारे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.

निमित्त आहे ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या निमित्ताने दादरमध्ये होणाऱ्या गुंतवणूक साक्षरता उपक्रमाचे. ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत या कार्यक्रमात अर्थतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे गुंतवणूकविषयक शंकांचे सविस्तर निरसन होणार आहे. यानिमित्ताने ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाचे प्रकाशनही होणार आहे. या कार्यक्रमाचे विजया ग्रुप आणि फाइव्हब्रिक रिअ‍ॅल्टी प्रा. लि. पॉवर्ड बाय पार्टनर, तर अपना सहकारी बँक लि. बँकिंग पार्टनर आहेत.

अर्थसंकल्प, त्यातील तरतुदी, त्याचे परिणाम आदींविषयीच्या विवेचनासह आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक असा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ हा विशेषांक यंदा सलग सातव्या वर्षी प्रकाशित करण्यात येत आहे.

या वेळी ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे हे ‘समभागातील गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण’, सनदी लेखापाल आणि ‘सेबी’ मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे या ‘गुंतवणुकीतून कुटुंबाचे आर्थिक आणि कर नियोजन’, तसेच वस्तू-बाजाराचे विश्लेषक श्रीकांत कुवळेकर हे ‘गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापना’च्या पर्यायांचा यानिमित्ताने ऊहापोह करतील. या कार्यक्रमासाठी सर्वाना प्रवेश खुला आणि विनामूल्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 3:32 am

Web Title: loksatta launches yearly investment magazine arthabrahma zws 70
Next Stories
1 सागरी सेतूवर ‘फास्टॅग’ सुसाट
2 शारदेच्या झुंबराचे शब्द अद्भुत लोलक
3 नव्या कररचनेनुसार आज गुंतवणूकदारांना मार्गदर्शन
Just Now!
X