आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, अशा चच्रेत सहभागी होण्याची अनोखी संधी ‘लोकसत्ता लाइव्ह चॅट’च्या माध्यमातून वाचकांना मिळणार आहे. ‘प्रगतिपुस्तक लोकप्रतिनिधींचं!’ या विषयाअंतर्गत येत्या गुरुवारी (२ फेब्रुवारी) दुपारी १२ ते १ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर ही चर्चा लाइव्ह रंगणार आहे. आपल्या आजूबाजूच्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत, वर्षांनुवष्रे समस्या का सुटत नाहीत, निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवारांची माहिती कशी आणि कुठे मिळते, लोकप्रतिनिधी नक्की काय काम करतात, निधी कसा वापरला जातो, नेत्यांचं प्रगतिपुस्तक कोण तयार करतं, मतदार कोणत्या निकषावर मतदान करतात या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न चच्रेदरम्यान करण्यात येणार आहे.

निवडणुकीसंदर्भात काम करणाऱ्या नामवंत संस्थांचे प्रतिनिधी या चच्रेत सहभागी होणार आहे. अजित रानडे (असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच), श्यामा कुलकर्णी (अ‍ॅक्शन फॉर गुड गव्हर्नन्स अ‍ॅण्ड नेटवìकग इन इंडिया) आणि मिलिंद म्हस्के (प्रजा फाऊंडेशन) ही निवडणूक विषयाचा अभ्यास असलेली तज्ज्ञ मंडळी या वेळी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देतील.

प्रश्न कसा आणि कुठे विचाराल?

  • दुपारी १२ ते १ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर (facebook.com/LoksattaLive) अजित रानडे, श्यामा कुलकर्णी आणि मिलिंद म्हस्के यांच्या चच्रेचा व्हिडीओ लाइव्ह दिसेल. त्या व्हिडीओच्या खाली तुम्हाला तुमचा प्रश्न विचारायचा आहे. व्हिडीओच्या माध्यमातूनच मान्यवरांकडून तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातील.
  • तुम्ही तुमचे प्रश्न ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजच्या ‘इनबॉक्स’मध्ये किंवा ’ express@gmail.com या ईमेल आयडीवरही पाठवू शकता. सोबत तुमचे नाव आणि ठिकाणाची नोंद असणे गरजेचे आहे.
  • ‘लोकसत्ता’च्या ट्विटर पेजला (com/LoksattaLive) लाईक करून #LoksattaLiveChat हा हॅशटॅग वापरूनही तुम्ही प्रश्न विचारू शकता.
  • कधी : गुरुवार, २ फेब्रुवारी २०१७
  • किती वाजता : दुपारी १२ ते १.
  • कुठे : लोकसत्ता फेसबुक पेज (facebook.com/LoksattaLive)