15 July 2020

News Flash

चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणास सशर्त परवानगी

दोन महिन्यांहून अधिक काळ चित्रीकरण बंद असल्याने अनेक चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण रखडले आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : लाइट.. कॅ मेरा.. अ‍ॅक्शनची अद्भुत सिनेनगरी पुन्हा एकदा लवकरात लवकर झगमगून उठणार आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रीकरणाला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सांस्कृतिक कार्य विभागाने रविवारी निर्णय जाहीर के ला असून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास सशर्त मान्यता देण्यात आली आहे.

दोन महिन्यांहून अधिक काळ चित्रीकरण बंद असल्याने अनेक चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण रखडले आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले असले तरी पोस्ट प्रॉडक्शनची कामे खोळंबली आहेत. या सगळ्या कामांना गती मिळावी, यासाठी मराठी कलाकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचे सदस्य आणि काही निर्मात्यांचीही मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीत ठरवल्यानुसार गेल्या आठवडय़ात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रोडय़ूसर्स गिल्डने चित्रपटनिर्मितीशी संबंधित प्रत्येक विभागात काय काळजी घेऊन चित्रीकरण करता येईल, यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, उपाययोजना यांचे ३७ पानी सादरीकरण के ले होते. या सगळ्यावर विचारविनिमय करून शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्मात्यांना चित्रपटनिर्मितीपूर्वीची आणि नंतरची कामे करता येतील, असे नमूद करण्यात आले आहे. नियमांनुसार चित्रीकरण न झाल्यास कामे बंद करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

अर्ज करावा लागणार

चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळाव्यात, अशी विनंतीही निर्मात्यांकडून करण्यात आली होती. सध्या चित्रीकरणाच्या कामांना परवानगी मिळवण्यासाठी निर्मात्यांना मुंबईत गोरेगाव येथील चित्रनगरीत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अर्ज करावे लागतील, तर उर्वरित जिल्ह्य़ांतील जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.

यामुळे ८५ मालिका, १५ नवीन मालिका, ओटीटीच्या काही मालिका तसेच चित्रपटांच्या कामांना गती मिळणार आहे. मर्यादित स्वरूपात चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. कलाकारांची संख्या तेवढीच राहणार असून उर्वरित क्रूची संख्या ३३ टक्क्यांवरआणावी लागणार आहे.  राज्य सरकारने हा निर्णय घेऊन इंडस्ट्रीच्या कामांना गती दिल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत.

– नितीन वैद्य, निर्माता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 3:25 am

Web Title: maharashtra government permission for film tv and web series shooting zws 70
Next Stories
1 Coronavirus : मुंबईतील रुग्णसंख्या ३९,४६४
2 मोक्षसेवेचे स्टार्टअप!
3 वरळी कोळीवाडय़ातील ७५ टक्केभाग ‘प्रतिबंध’मुक्त
Just Now!
X