News Flash

विधान परिषदेच्या नव्या सभापतींची निवड शुक्रवारी

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे नव्या सभापतींची निवड येत्या शुक्रवारी होणार आहे.

| March 18, 2015 12:29 pm

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे नव्या सभापतींची निवड येत्या शुक्रवारी होणार आहे. सभापतीपदासाठी आवश्यक असल्यास येत्या शुक्रवारी निवडणूक होणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव सोमवारी ४५ विरुद्ध २२ मतांनी मंजूर करण्यात आला. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी राष्ट्रवादीच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. आता विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकत्र येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अविश्वास प्रस्तावावरून शिवसेनेने आपल्या मित्रपक्षावर जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर मतदानावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभापतीपदी राष्ट्रवादीला तर उपसभापतीपदी भाजपच्या सदस्याला संधी देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे सभापतीपदासाठी अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, साताऱयातील पक्षाचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:29 pm

Web Title: maharashtra legislative council speaker will be elected on friday
Next Stories
1 मुंबईकरांवर मालमत्ता कराचा अतिरिक्त ५७ ८कोटींचा भार
2 वीजनिर्मिती क्षमतेत २० टक्क्यांनी वाढ
3 ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेत स्वप्नातील घर सत्यात..!
Just Now!
X