News Flash

शिवसेना नेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिवसेना नेते वासुदेव नांबियार (वय ६१) यांना अटक करण्यात आली आहे. सदर मुलीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

| September 6, 2014 12:23 pm

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिवसेना नेते वासुदेव नांबियार (वय ६१) यांना अटक करण्यात आली आहे. सदर मुलीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
ठाण्यातील काशिमिरा टाऊनशीप येथील शाळेचे आणि मंदिराचे मालक असलेल्या वासुदेव नांबियार यांना शुक्रवारी अटक करण्यात आल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कदम यांनी दिली. नांबियार चालवत असलेल्या शाळेत ही मुलगी नववी इयत्तेत शिकत होती. यादरम्यान, देवळात जाण्याच्या बहाण्याने नांबियार या मुलीला अनेकदा आपल्यासोबत नेत. त्यावेळी त्यांनी संबंधित मुलीवर बलात्कार केल्याची माहिती आहे. तसेच, याप्रकाराबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही त्यांनी तिला दिली होती. मात्र, सदर घटनेनंतर ही मुलगी गर्भवती राहीली आणि तिने सात महिन्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. नांबियार यांच्यावर ३७६ आणि ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 12:23 pm

Web Title: maharashtra shiv sena leader held for rape after class 9 student delivers a premature baby
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ २५ सप्टेंबरला
2 राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा
3 ‘चिनी दरवळ’ भारतीय कामगारांच्या मुळावर!
Just Now!
X