महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा ८९.५६ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून, ९१.४१ टक्के मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल ८७.९८ टक्के इतका लागला आहे.
दहावीच्या परीक्षेत ३९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीमध्ये १.९० टक्के इतकी घट झाली आहे. विद्यार्थ्यांना १५ जून रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या शाळेमध्ये गुणपत्रिका मिळणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.
यंदापासून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कलचाचणीचे निष्कर्षही १५ जूनला गुणपत्रकाबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. त्यासाठीचा अर्जाचा नमुना राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून, सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे – ९३.३०
मुंबई – ९१.८०
नागपूर – ८५.३४
अमरावती – ८४.९९
नाशिक – ८९.६१
कोल्हापूर – ९३.८९
कोकण – ९६.५६
लातूर – ८१.५४
औरंगाबाद – ८८.०५
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
http://www.result.mkcl.org
http://www.maharashtraeducation.com
http://www.rediff.com/exams
http://maharashtra10knowyourresult.com
http://www.mahresult.nic.in