10 April 2020

News Flash

‘हृदयेश फेस्टिव्हल’मध्ये आजपासून दिग्गजांचा ‘महाउत्सव’

रसिकप्रिय कलाकारांच्या सहभागाची परंपरा असलेल्या ‘हृदयेश’ या महोत्सवाचे यंदाचे सव्विसावे वर्ष आहे.

मुंबईच्या सांस्कृतिक भावविश्वाचा अविभाज्य भाग असलेला आणि तमाम शास्त्रीय संगीतातील रसिकांना एका सुरात बांधणारा ‘हृदयेश फेस्टिव्हल’चा ‘महाउत्सव’ आजपासून ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. या तीन दिवसांत रसिकांना शास्त्रीय संगीताची पर्वणी लाभणार आहे. ‘लोकसत्ता’ प्रस्तुत या महोत्सवाचे आयोजन विलेपाल्रे पूर्व येथील साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या विशेष प्रेक्षागाराला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी. एन. पोतदार यांचे नाव देण्यात येणार आहे.

रसिकप्रिय कलाकारांच्या सहभागाची परंपरा असलेल्या ‘हृदयेश’ या महोत्सवाचे यंदाचे सव्विसावे वर्ष आहे. सलग तीन दिवस चार सत्रांत रंगणाऱ्या या महोत्सवात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे गायन तसेच ‘लिजंडस मीट’ या शीर्षकांतर्गत रसिकांच्या आग्रहास्तव होत असलेली पं. कुमार बोस व पं. अिनदो चटर्जी यांची तबला जुगलबंदी ही यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्टय़े आहेत. संगीतक्षेत्रात आयुष्य समíपत करणाऱ्या कलाकाराला दिला जाणारा ‘हृदयेश संगीत सेवाव्रती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ सतारवादक व बंदिश रचनाकार पं. शंकर अभ्यंकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘हृदयेश’चे अविनाश प्रभावळकर यांनी दिली. ग्वाल्हेर घराण्याच्या पं. अभ्यंकर यांनी संगीतसाधना हाच श्वास मानून पं. शंकरराव व्यास यांच्याकडून गुरुकुल पद्धतीने सतारीचे शिक्षण घेतले आहे. पं. अभ्यंकरांनी सुमारे साठ बंदिशीही रचल्या असून अनेक गायकांसाठी त्या उपयुक्त ठरल्या आहेत.
महोत्सव असा रंगणार
शुक्रवार ११ डिसेंबर, सायंकाळी ६ – पं. जयतीर्थ मेवुंडी (गायन), पं. रुपक कुलकर्णी (बासरी), कला रामनाथ (व्हायोलिन) आणि उस्ताद राशिद खान (गायन)शनिवार १२ डिसेंबर, सायंकाळी ६ – राहुल शर्मा (संतूर), गानसरस्वती किशोरी आमोणकर (गायन) रविवार १३ डिसेंबर, सकाळी ६.३० – पं. बुधादित्य मुखर्जी (सतार), सायंकाळी ६ – डॉ. व्यंकटेशकुमार (गायन), पं. कुमार बोस आणि पं. अिनदो चटर्जी यांची तबला जुगलबंदी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 12:17 am

Web Title: mahautsav starts from today
Next Stories
1 भारतीय सैनिकांच्या शौर्याला मुंबईकर विद्यार्थ्यांचा सलाम
2 ‘हब्रेरियम’ पुन्हा एकदा
3 राज्य नाटय़ स्पर्धेत ‘असुरवेद’, ‘धुऑं’, ‘बेबी’ अंतिम फेरीत
Just Now!
X