मुंबई :  कुरार परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ५० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगा कुटुंबासह कुरार येथील पठाणवाडी भागात राहतो. आरोपी बेगही त्याच परिसरात वास्तव्याला आहे. बेग याने मागील आठवडय़ात मदतीच्या बहाण्याने या मुलाला घरी बोलाविले होते. त्यावेळी त्याने मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. मात्र मुलाने आरडाओरडा सुरू केल्याने त्याने मुलाला सोडले. मात्र पुन्हा दोन दिवसांनी त्याने मुलाला बोलवून त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.