News Flash

मुंबईत नोकरीसाठी आलेल्या तरुणीवर ऍसिड हल्ला

वांद्रे टर्मिनसवर एका अज्ञात व्यक्तीने २५ वर्षांच्या तरुणीवर गुरुवारी सकाळी ऍसिड फेकले.

| May 2, 2013 06:41 am

वांद्रे टर्मिनसवर एका अज्ञात व्यक्तीने २५ वर्षांच्या तरुणीवर गुरुवारी सकाळी ऍसिड फेकले. संबंधित तरुणी नोकरीवर रुजू होण्यासाठी आपल्या कुटुंबियांसोबत दिल्लीहून आली होती. वांद्रे टर्मिनसवर हे कुटूंब उतरल्यावर ही घटना घडली. आर. प्रिती असे या तरुणीचे नाव आहे. 
प्रिती गुरुवारी सकाळी सव्वाआठ वाजता गरीब रथने वांद्रे टर्मिनसवर उतरली. त्याचवेळी तोंडावर रुमाल बांधलेला एक तरूण तिच्याजवळ आला. त्याने स्वतःजवळी भांड्यात आणलेले ऍसिड प्रितीच्या तोंडावर फेकले आणि गर्दीचा फायदा घेऊन तो तेथून पळून गेला. प्रितीसोबत तिचे वडील आणि इतर नातेवाईकही यावेळी तिथे होते. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ऍसिडमुळे प्रितीचा एक डोळा गेल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
(संग्रहित छायाचित्र) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2013 6:41 am

Web Title: man throws acid on womans face at bandra terminus
Next Stories
1 LIVE : कॅम्पाकोलातील नागरिकांकडून कारवाईविरोधात होमहवन
2 डिसेंबरच्या मुहूर्तावरही प्रश्नचिन्ह
3 म्हाडावासीयांना घराबाहेर काढण्यात ‘कृष्णा खोरे’ च्या उपाध्यक्षांना रस
Just Now!
X