05 August 2020

News Flash

इमोशनल ब्लॅकमेलिंग, गर्लफ्रेंडने न्यूड फोटो पाठवल्यानंतर त्याने दाखवले खरे रंग

आरोपीने पीडित तरुणीला तिचे न्यूड फोटो पाठवायला सांगितले. तरुणीवर दबाव आणण्यासाठी आरोपीने आत्महत्येची धमकी दिली.

सोशल मीडियावर पूर्व प्रेयसीचे बनावट अकाऊंट बनवून त्यावर तिचे न्यूड फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी शुक्रवारी बिझनेसमॅनला अटक केली. २०१७ साली ही घटना घडली होती. आरोपी गुन्हा करुन दुबईला निघून गेला होता. दोन वर्षांनी मायदेशी परतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

पीडित तरुणीची २०१३ साली आरोपीबरोबर ओळख झाली होती. तो तिच्या भावाचा मित्र होता. ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. २०१५ साली आरोपीने पीडित तरुणीला तिचे न्यूड फोटो पाठवायला सांगितले. तरुणीवर दबाव आणण्यासाठी आरोपीने आत्महत्येची धमकी दिली. फोटो पाठवले नाहीस तर, स्वत:ला सिगारेटचे चटके देईन असे सांगून त्याने इमोशनल  ब्लॅकमेलिंग केले.

अखेर दबावाला बळी पडून तरुणीने तिचे न्यूड फोटो पाठवले. भावाला त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजल्यानंतर त्याने बहिणीला आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड करण्याची धमकी दिली. आरोपी सतत दिली धमकी देत होता.

अखेर २०१७ साली त्याने तिच्या नावाचे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट बनवले व तिचा न्यूड फोटो अपलोड केला. तरुणीला याबद्दल समजल्यानंतर तिने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. आरोपी विरोधात ३५४(सी), ६७अ या कलमातंर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी पोहोचले, त्यावेळी तो दुबईल पळून गेल्याचे समजले. आरोपी दुबईवरुन परतल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला निवासस्थानाहून अटक केली. कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 3:58 pm

Web Title: man who posted nude photo of girlfriend online in 2017 arrested in goregaon dmp 82
Next Stories
1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
2 “शरद पवार जाणता राजा होते…आहेत आणि राहणारच”, मुंबईत झळकलं पोस्टर
3 ‘केजी’पासूनच ‘लुटारंभ’
Just Now!
X