िबबीसारनगर वसाहतीमधील रहिवाशांना दिलासा

िबबीसारनगर संकुलास गेल्या एक दशकापासून भरावा लागणारा सुमारे रुपये चार कोटींचा व्यवस्थापन कर अखेर रद्द करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आली आहे. िबबीसारनगर वसाहतीत एकूण ११ सोसायटय़ा आहेत. यात सुमारे १३५३ घरकुले आहेत. या सोसायटय़ांची नोंदणी होत नाही तोपर्यंत येथील कामांची देखभाल म्हाडातर्फे करण्यात येत होती.

२००४ मध्ये या सर्व सोसायटय़ांची नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर येथील देखभालीचे काम सोसाटय़ांमार्फत करण्यात येत होते. तसे पत्रही म्हाडाने सोसायटय़ांना पाठविले होते. ज्या दिवसांपासून सोसायटय़ांनी देखभालीचे काम हाती घेतले त्यापासून म्हाडाकडून व्यवस्थापन कर रद्द होणे अपेक्षित होते.

मात्र याबाबत म्हाडाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून व्यवस्थापन कर आकारणी बंद करण्याबाबत काहीच हालचाली होत नव्हत्या. यासंदर्भात राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी बठक बोलावली व स्थानिक रहिवाशांची मागणी योग्य असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन व्यवस्थापन आकार रद्द केल्याचे पत्र नुकतेच दिले. या निर्णयामुळे प्रत्येक सदनिकाधारकाची रुपये १०० दर महिना बचत झालेली असून त्यांचा अभिहस्तांतरणाचा मार्गही सुकर झाला आहे.