03 June 2020

News Flash

विद्यापीठे, महाविद्यालयांमध्येही ‘मराठी भाषा गौरव’ दिन

लोक साहित्य-उत्सव मराठीचा ही यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, तसेच खासगी, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आज, २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत त्यासंबंधीचे निवेदन केले.

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे, शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, तसेच मॉडेल पदवी महाविद्यालये व परिसंस्था, कला संचालनालय व त्या अधिपत्याखालील कार्यालये तसेच तंत्र शिक्षण संचालनालय, त्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था यामध्ये विविध उपक्रम आयोजित करून समारंभपूर्वक मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाची संकल्पना.. : विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे सांगण्यात आले आहे. लोक साहित्य-उत्सव मराठीचा ही यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यानुसार लोकसाहित्याचा प्रचार व प्रसाराकरिता विविध स्पर्धाचे आयोजन करणे, पुस्तके व कोश याबाबत चर्चा, परिसंवाद, व्याख्याने इत्यादी उपक्रम राबवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:33 am

Web Title: marathi language day marathi bhasha din celebration in universities and colleges zws 70
Next Stories
1 ‘मुंबई श्री’च्या मंचावर अवतरणार पीळदार सौंदर्य; ‘मिस मुंबई’साठी चुरशीची लढत
2 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला
3 भाजपा आमदार सभागृहात घालून आले भगव्या टोप्या
Just Now!
X