सीएसटी येथील भुयारी मार्गात कोरियन नागरिकाला लुटणाऱ्या त्रिकुटातील एका तरुणास आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. रुपेश र्मचडे (२९) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे तो मेकॅनिकल पदवीधर आह़े
४ मे रोजी दक्षिण कोरियन नागरिक चँग हून हो मुंबईत आले होते. त्यांचा कापडाचा व्यवसाय आहे. ते सीएसटी स्थानक परिसरात असताना त्रिकुटाने त्यांना भुयारी मार्गावरील पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ अडवून त्यांच्या खिशातील पाकीट काढून पळ काढला होता़ याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी र्मचडे हा अंधेरीत राहतो. त्याने मेकॅनिकल पदविका संपादन केली होती. परंतु नोकरी मिळत नसल्याने त्याने परदेशी नागरिकांसाठी गाईड म्हणून काम सुरू केले होते. तो वांद्रे येथून राजस्थानच्या अजमेर शरीफ दग्र्याला जात असताना त्याला अटक केल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास कुंभार यांनी दिली.