आमच्या पाचही मागण्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा गेल्या चार दिवसांपासून संपावर गेलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) दिला आहे. शुक्रवारी या अस्थायी डॉक्टरांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.