रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या रविवारी पश्चिम रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही.
मध्य रेल्वे
कुठे- माटुंगा व मुलुंड या स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर
कधी- सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वा.
परिणाम- ब्लॉकदरम्यान डाउन धीम्या मार्गावरील गाडय़ा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा माटुंगा ते मुलुंड या दरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्ग
कुठे- कुर्ला ते मशिद या स्थानकांदरम्यान अप मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीमंदरम्यान अप व डाऊन मार्गावर
कधी- सकाळी ११.३० ते ३.३० वा.
परिणाम- ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वांद्रे, अंधेरी, बोरिवली या दरम्यानची वाहतूक पूर्ण बंद राहील. तर पनवेलच्या दिशेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या सर्व अप गाडय़ा कुल्र्याहून मुख्य मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा शीव ते भायखळा या दरम्यान मुख्य मार्गावरून चालवल्या जातील आणि त्या शीव, माटुंगा, दादर आणि परळ या स्थानकांवर थांबतील.